Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

वरकुटे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माजी आ. जगताप गटाचे तानाजी बेडकुते , व्हा चेअरमन पदी सोमनाथ जगदाळे यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी वरकुटे  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली होती .सर्वच्या सर्व १३ जागांवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे समर्थक बिनविरोध निवडले होते . तद्नंतर चेअरमन व व्हा . चेअरमन निवडीची प्रक्रिया देखील चेअरमन पदासाठी तानाजी बेडकुते व व्हा . चेअरमन पदासाठी सोमनाथ जगदाळे यांचा एकेकच अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी उमेश बेंडारी यांचे अध्यक्षते खालील सहाय्यक निबंधक सह . संस्था कार्यालयातील बैठकीत अविरोध पार पडली . बैठकीस नुतन सदस्य तानाजी बेडकुते , सोमनाथ जगदाळे ,बालाजी मोघल , रावसाहेब जगदाळे , सुरेश जाधव , रामचंद्र जगताप , प्रसाद जगताप , नामदेव शिंदे , सुरेश मस्के , सोजरबाई जगताप , भागिरथी जगताप , सविता बेडकुते उपस्थित होते . बेडकुते व जगदाळे यांचे सह सर्व नूतन सदस्यांचे आमदार संजयमामा शिंदे , माजी आमदार जयवंतराव जगताप , नगराध्यक्ष वैभव जगताप ,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी अभिनंदन केले आहे. शेवटी आभार संस्थेचे सचिव तथा मार्केट कमिटीचे संचालक सदाशिव पाटील यांनी मानले . : -* वरकुटे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली होती .सर्वच्या सर्व १३ जागांवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे समर्थक बिनविरोध निवडले होते . तद्नंतर चेअरमन व व्हा . चेअरमन निवडीची प्रक्रिया देखील चेअरमन पदासाठी तानाजी बेडकुते व व्हा . चेअरमन पदासाठी सोमनाथ जगदाळे यांचा एकेकच अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी उमेश बेंडारी यांचे अध्यक्षते खालील सहाय्यक निबंधक सह . संस्था कार्यालयातील बैठकीत अविरोध पार पडली . बैठकीस नुतन सदस्य तानाजी बेडकुते , सोमनाथ जगदाळे ,बालाजी मोघल , रावसाहेब जगदाळे , सुरेश जाधव , रामचंद्र जगताप , प्रसाद जगताप , नामदेव शिंदे , सुरेश मस्के , सोजरबाई जगताप , भागिरथी जगताप , सविता बेडकुते उपस्थित होते . बेडकुते व जगदाळे यांचे सह सर्व नूतन सदस्यांचे आमदार संजयमामा शिंदे , माजी आमदार जयवंतराव जगताप , नगराध्यक्ष वैभव जगताप ,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी अभिनंदन केले आहे. शेवटी आभार संस्थेचे सचिव तथा मार्केट कमिटीचे संचालक सदाशिव पाटील यांनी मानले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group