जगद्गगुरु नरेंद्राचार्य महाराजांचा 30 एप्रिल रोजी माळशिरस येथे पादुका दर्शन प्रवचन सोहळा
करमाळा प्रतिनिधी जगद्गुगुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व पादुका दर्शन सोहळा माळशिरस येथील पुणे पंढरपुर रोडवर असलेल्या शासकीय बालगृह मैदानावर शनिवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती जिल्हा सेवा अध्यक्ष शरद मते सर व जिल्हा निरीक्षक राजेंद्र भुयार यांनी दिली आहे.शनिवारी सकाळी आठ वाजता शहरातील मारुती मंदिरापासून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून यात प्रथम निशाणधारी पुरुष महिला ढोलपथक कलशधारी महिला,राम पंचायतन सोहळ्याचा भजन मंडळ सिध्दपादुका व प्रतिमा रथ भक्त मंडळ सहभागी होणार आहेत.श्रीचे पादुकापुजन, सामाजिक उपक्रम, गुरूपुजन,आरती,प्रवचन भक्त शिष्य दिक्षा दर्शन,अशा विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिकवणीनुसार गरीब,गरजु, निराधार कुटुंबाचा चरितार्थ चालावा म्हणून घरघंटी (पिठाची गिरणी) चे मोफत वाटप करण्यात येणार आहे.या भव्य सोहळ्याला सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागातुन भाविक भक्त मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्यामुळे या सोहळ्याची जय्यत तयारी प्रचार प्रसार गेल्या महिनाभरापासून स्व स्वरुप संप्रदाय सोलापूर जिल्ह्याचे आजी माजी पदाधिकारी, हितचिंतक भक्त,साधक, शिष्य,ज.न.म.प्रवचनकार करीत आहेत.जगद्गगुरु नरेंद्राचार्य महाराजांचा भक्तवर्ग मोठ्या संख्येने असल्यामुळे कार्यकर्त्यांसाठी भव्य असा मंडप उभारला असून येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.तरी या सोहळ्याला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहुन याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व स्वरुप संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक राजेंद्र भुयार , सोलापूर जिल्हा अध्यक्ष शरद मते जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
