अयोध्या येथील राम मंदिर भूमीपूजनाच्या पाश्वभूमीवर वीट येथे नागरीकांना लाडू वाटप करुन आनंद साजरा

करमाळा प्रतिनिधी. अयोध्या येथे राम मंदिर भूमीपूजनाच्या पाश्वभूमीवर वीट येथे नागरीकांना लाडू वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला.
मा.विलास(आबा)जाधव उर्फ जय श्रीराम यांनी कार्यक्रम आयोजित केला. प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे भाजपा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा सचिन गायकवाड, वीट गावचे सरपंच उदय ढेरे, भगवान गिरीगोसावी ,हेमंत आवटे, ज्ञानेश्वर ढेरे, पवन जाधव, स्वप्निल आवटे, आनंद जाधव, रमेश गोंदकर, महाराज प्रदीप ढेरे ,मच्छिंद्र जाधव, दिगंबर जाधव, सुभाष आवटे, बाळू जाधव, दत्तू जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
