करमाळा येथे अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा.

करमाळा प्रतिनिधी. अयोध्या येथे राम मंदिर भूमीपूजनाच्या पाश्वभूमीवर करमाळा येथील हनुमान मंदिर आय सी आय सी बँक शेजारी येथे नागरीकांना लाडू वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला,यावेळी हनुमान, मूर्तीचे पुजन करन्यात आले, यावेळी श्रीराम मंदिराची सुबक रांगोळी काढण्यात आली होती, राम जन्मभूमी साठी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल , भारतीय जनता पार्टी आणि त्याबरोबरच अनेक राम भक्तांनी बलिदान दिलं, त्या बलिदानाचे फलित आज आपणाला बघायला मिळत आहे.असे मत भारतीय जनता पार्टी चे तालुका सरचिटणीस नगरसेवक महादेव(आणा) फंड यांनी व्यक्त केले, या आनंद ऊत्सव क्षणी शशिकांत पवार, आदेशजी कांबळे ,मयूर देवी ,राजू डावरे ,लाला जव्हेरी, संदीप जाधव, संदीप पवार, उमेश बनकर, नवनाथ पवार, अमोल रोकडे, कुमार पाटील सर, नामदेव सरडे, अभिजीत चव्हाण उपस्थित होते.
