वाशिंबे चौफुला येथे श्रीराम मंदिर भूमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा.

करमाळा प्रतिनिधी
अयोध्या येथे राम मंदिर भूमीपूजनाच्या पाश्वभूमीवर वाशिंबे चौफुला येथे नागरीकांना पेढे वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला,यावेळी वाशिंबे चौकात प्रभु श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, यावेळी श्रीराम मंदिराची सुबक रांगोळी काढण्यात आली होती, राम जन्मभूमी साठी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल , भारतीय जनता पार्टी आणि त्याबरोबरच अनेक राम भक्तांनी बलिदान दिलं, त्या बलिदानाचे फलित आज आपणाला बघायला मिळत आहे.असे मत भारतीय जनता पार्टी चे युवा नेते अमोल पवार यांनी व्यक्त केले . या आनंदउत्सवा क्षणी विहींपचे संतोष वाळुंजकर, अँड, निलेश वाघमोडे,वाशिंबे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र डोंबाळे, समाधान कांबळे, गणेश वाघमोडे,सागर खंडागळे, प्रविण पवार, ओंकार वाघमोडे,तुषार वाळुंजकर, हनुमंत निकत, उपस्थित होते.
