सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्यावतीने आमरण उपोषणकर्त दत्ता पाटील यांना जाहीर पाठिंबा
करमाळा प्रतिनिधी आझाद मैदान मुंबई येथे दत्ता पाटील हडसनी तालुका हदगाव जिल्हा नांदेड हे मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले आहेत त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील मराठा समाज बांधव व बहुजन बांधव उपस्थित मोठ्या संख्येने होता. यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते कैलासवासी विनायक रावजी मेटे साहेब यांचे अपघाती निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहून यावेळी मराठा आरक्षण पाठिंबाचे निवेदन देण्यात आले . तसेच मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा त्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला यावेळी असंख्य बहुसंख्य मराठा आरक्षण प्रेमी उपस्थित होते यावेळी जय जिजाऊ जय शिवराय ,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ,मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी जोरदार मागणी व घोषणा उपस्थिततांकडून देण्यात आल्या व दत्ता पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची तब्येत प्रकृती खालवत चाललेलि असून त्यांचे जर काही बरे वाईट झाले तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब जबाबदार असतील असंही या निवेदनामध्ये मनले आहे व जर दत्ता पाटील यांना जर काही दुखापत इजा व शारीरिक व्याधी जर झाली तर सर्वस्वी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासन जबाबदार असेल व दत्ता पाटील यांना न्याय जर नाही मिळाला तर मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांना फिरवू न देण्याचा इशारा यावेळी उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला .
