Saturday, April 4, 2026
Latest:
करमाळा

लोकहिताची कामे थांबवु नका, तातडीने चालु व्हावीत- ॲड. अजित विघ्ने यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्रात  सत्ता बदल झाला तसे महाराष्ट्रातील आणि करमाळा तालुक्यातील अनेक लोकविकासाच्या कामांना ब्रेक लावण्याचे काम विद्यमान सरकारने केले आहे. याबाबत काही लोकांनी या विरुद्ध आवाज ऊठवित याचिका देखिल दाखल केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी वर्गासाठी महत्वाची घोषणा करून रेग्युलर कर्जदार यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले परंतु ते देखिल सर्वांना अद्याप मिळालेले नाही. एक दोन याद्या आल्या तेवढ्याच काही लोकांना अनुदान मिळाले असुन उर्वरीत सर्व पात्र शेतकरी वर्गाला अनुदान मिळावे तसेच करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांनी अनेक रस्ता, वीज, पाणी, आरोग्य याबाबतच्या लोकविकास योजनांना मंजुरी मिळविली आहे. परंतु या कामांना ब्रेक लावण्याचे काम विद्यमान सरकारकडून राजकीय हेतुने होत आहे. परंतु लोकविकासाच्या कामांना अडथळे न आणता ही कामे तातडीने चालु करावीत याबाबतचे पत्र मुख्यमंत्री यांना सडेतोड पणे पाठविले असुन, याची माहिती ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!