करमाळा शहरामध्ये 20 ऑगस्ट 16 तर ग्रामीण भागात 13 कोरोना पाॅझिटिव्ह एकुण 29 कोरोना रुग्ण आजपर्यंत एकुण कोरोना रुग्णांची संख्या 403.

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात 20ऑगस्ट रोजी 143 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल 29 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना आज करमाळा शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज करमाळा शहरात 51 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल 16 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर ग्रामीण भागात 92 ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून यात 13 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये ग्रामीण भागातील जिंतीमध्ये पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे पाच जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत 240 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. तालुक्यात आजपर्यंत 6 कोरोनाबाधीतांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या 154 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 403 आहे. करमाळा शहरातील 16 कोरोनाबाधीतांपैकी संभाजीनगर येथे 3, महिला, कृष्णाजीनगर येथे 1 पुरुष, 2 महिला, तेली गल्ली येथे 1पुरुष, राशीन पेठ येथे 2 पुरुष, 1 महिला, शिवाजीनगर येथे 1 पुरुष व मंगळावर पेठ येथे 3 पुरुष 1 महिलेचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात सावेडी येथे 2 महिला, तरटगाव येथे 1पुरुष, केम येथे 2पुरुष 5 महिला, जिंती येथे 2 पुरुष 1महिला यांचा समावेश आहे. या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन वीणा पवार यांनी केले आहे.
