आषाढी एकादशीनिम्मित करमाळा शहरात स्वच्छता रस्त्याची डागडुजी करण्याची भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनची नगरपालिकेच्या मुख्याधिकारींना मागणी
करमाळा प्रतिनिधी 12/06/2023 रोजी करमाळा शहरात आषाढी वारी एकादशी निमित्त विविध मार्गांनी येणाऱ्या दिंड्या यांच्या आगमना पुर्वी शहरातील विविध भागात रस्ते व लाईट यांची दुरुस्ती करणे, गटारी स्वच्छ करणे, जंतुनाशक औषधे फवारणी करावी, भरपूर प्रमाणात पाण्याची सोय करणे , सुलभ शौचालये स्वच्छ करणे अशी मागणी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन व करमाळा मुस्लिम समाज यांच्या तर्फे करमाळा नगरपालिका यांच्या कडे करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक समीर शेख, जमीर सय्यद (जामा मस्जिद चे विश्वस्त अध्यक्ष) , सचिव पिंटु बेग, दिशानभाई कबीर उपस्थित होते.