करमाळा नगरपरिषदेच्या कणखर. व कर्तव्यदक्ष अधिकारी मुख्याधिकारी -वीणा पवार.




करमाळा प्रतिनिधी मार्च 2020 पासून करमाळा शहराला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या मुख्याधिकारी वीणा पवार यांचे कर्तव्यदक्ष हे रूप आपण सर्वांनी बघितले मात्र त्याची कणखर भुमिका अजून एका प्रसंगातून समोर आली.
मुख्याधिकारी वीणा पवार या गेल्या पाच महिन्यापासून करमाळ्यात कोरोनाविषयक कर्तव्य पार पाडत असल्यामुळे त्यांच्या मूळ गावी गेल्या नाहीत.त्यातच 8आँगस्टला त्यांच्या कुटुंबावर एक संकट कोसळल.8 आँगस्टला त्यांच्या मूळ गावी त्यांचे पति,मुलगी व सासूबाई यांना कोरोना झाल्याचे निदान झाले.घरात फक्त सासऱ्याची टेस्ट निगेटिव्ह आली.आधीच पाच महीने कुटुंबापासून दूर असणाऱ्या मुख्याधिकारी वीणा पवार यांनी एका बाजूला कुटुंब संकटात तर दुसऱ्या बाजूला करमाळा शहरात दिवसेंदिवस वाढत असणारी कोरोणाबाधितांची संख्या ……
अशा परिस्थितीत कोणत्याही सामान्य व्यक्तीने रजा काढून कुटुंबाकडे जाणे हाच पर्याय निवडला आसता….माञ मुख्याधिकारी वीणा पवार यांच्यातील कणखर,करारी,जिद्दी यौद्ध्याने एक धाडशी निर्णय घेतला.
त्यांनी सर्व घरातील कोरोना झालेल्या सदस्यांना करमाळा येथे शासकीय कोव्हिड केआर सेंटर येथे उपचारासाठी आणले.
त्यांनी त्यांच्या कुंटुंबाचीही सेवा केली आणि स्वतः चे कुंटुब मानलेल्या करमाळकरांचीही सेवा केली.दोन्ही कर्तव्य पार पाडतांना त्या तसूभरही मागे पडाल्या नाही.
खरंतर याप्रसंगात त्यांच्या लाडक्या कन्येलाही कोरोना झाला होता ही घटना त्यांच्यातील आईच्या ह्दयाला वेदना देणारी व विचलीत करणारी होती.पणा त्याचे कारणपुढे करून रजा घेऊन करमाळकरांना या कठीण वेळी कोरोणा संकटात वार्यावर सोडून जायचे यासाठी त्यांचे मन तयार होईना.
त्यामुळेच एका पारड्यात कुटुंब तर दुसऱ्या पारड्यात कर्तव्य आशा दोन्ही बाजूला समान न्याय देत त्यांनी कर्तव्य ही पार पाडले आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या ही पार पाडल्या,
आज आखेर 180 करमाळा शहरातील रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतवण्यात त्यांना यश आले तर त्याच्या घरातील तीनही सदस्य कोरोनामुक्त झाले आहेत.
हा प्रसंग ज्यांना ज्यांना माहित झाला त्यांनी मुख्यधिकारी या वाघाच्या काळजाच्या आहेत आणि अशा कठीण प्रसंगाला तोंड देणाऱ्या आणि विजयश्री खेचून आणणाऱ्या खर्या कोरोना यौद्ध्या आहेत आसे गौरवोद्गार काढले.
त्यांना याबद्दल विचारले असता ;
कर्तव्य व कुटूंब या दोन्हीला समान न्याय देणे गरजेच आहे.जिथं इतिहासात नरवीर तानाजी मालूसरे”आधी लगीन कौंढाण्याचे…..”म्हणत कर्तव्याला प्रथम स्थान देतात तर मग आपणही कोणत्याही कठीण प्रसंगातही कुटुंबाबरोबर कर्तव्यालाही समान व योग्य न्याय द्यायलाच हवा असे सांगितले .
आणि या प्रसंगातून खरोखर या भूमीला आनेक यौद्ध्यांचा,रणरागिणींचा वारसा लाभला आहे आणि तो वारसा वीणा पवार,मुख्यधिकारी करमाळा यासारखे कणखर व्यक्तीमत्व पुढे चालवत आहेत याची प्रचिती येते.
अशा कोरोना यौद्ध्यांना सलाम!
