Wednesday, April 23, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी पायी चालत घेतले जागृत देवस्थान आदिनाथाचे दर्शन

करमाळा प्रतिनिधी-महाशिवरात्रीनिमित्त संगोबा येथील जागृत शिवलिंग श्री आदिनाथ महाराजांचे आज पायी चालत जाऊन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर विश्वस्तांनी माननीय दिग्विजय बागल यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यांचे सोबत मार्केट कमिटीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर, व्हाईस चेअरमन चिंतामणी दादा जगताप, मकाई चे संचालक संतोष देशमुख, माजी संचालक प्राध्यापक प्रताप बर्डे, आदिनाथचे माजी संचालक दिनेश भांडवलकर, सचिन पिसाळ ,प्राध्यापक कल्याण सरडे सर, पोलीस पाटील बापू शिरगिरे स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविकांना दिग्विजय बागल यांनी महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या. जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यात्रेतील व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली, यात्रेतील चहाचा आस्वाद घेतला. याशिवाय शासनातर्फे तहसील कार्यालयाने उभा केलेल्या आपत्ती निवारण कक्षातील सदस्यांना भेटून यात्रेच्या नियोजनाची माहिती घेतली करमाळा डेपोमार्फत यात्रेकरूंना बसेसची व्यवस्थित सुविधा दिल्याबद्दल चालक वाहकांना भेटून त्यांचे आभार मानले, आपत्ती निवारण कक्षा मार्फत माननीय दिग्विजय बागल यांचे स्वागत श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. यावेळी अनेक भाविक दिग्विजय बागल यांना भेटून शुभेच्छा देत होते. विशेषतः महाविद्यालयीन युवा वर्गातील भाविकांमध्ये यामुळे उत्साह दिसत होता.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group