Wednesday, April 8, 2026
करमाळा

करमाळा नगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षांसह नगरसेवकपदासाठी करमाळ्यात ५४ अर्ज दाखल

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासह ५४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवकपदासाठी करमाळ्यात ५४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी करमाळा नगराध्यक्षपदासाठी जगताप (शिवसेना शिंदे गट) गटाकडून महानंदा जयवंतराव जगताप व सावंत गटाकडून मोहिनी संजय सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. तर नगरसेवकपदासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट, बागल गट, सावंत व भाजपच्या ५२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांच्याकडे दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी ५२ असे ५४ अर्ज दाखल झाले आहेत. काही उमेदवारीने डबल अर्ज दाखल केले आहेत. जयदीप शिंदे, इंदू कांबळे, मुकुंद राजुपाध्ये, पल्लवी अंधारे, राजू वाघमारे, रणजित कांबळे, गोपाल वाघमारे, सुनील धाकतोडे, ओंकार ढाळे, अभय महाजन, संजय सावंत, सचिन घोलप, विजयकुमार घोलप, लता घोलप, ज्योती घोलप, विक्रमसिंग परदेशी, सुरेखा जगताप, पुष्पा शिंदे, रवींद्र जाधव, ओंकार चांदगुडे, अमोल फंड, अतुल फंड, जबीन मुलाणी, ज्योती कांबळे, संदीप कांबळे, ज्योतीराम ढाणे, सुजाता ढाणे, किरण बोकन, संतोष सापते, प्रियंका गायकवाड, शोकत नालबंद, वनिता कांबळे, स्वाती माने, संग्राम माने, साधना मंडलिक, अलमुन शेख व विजया जानराव यांचे अर्ज दाखल झाले आहेत.करमाळा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 52 अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीमध्ये रंगत आली असून रविवार व सोमवार दिवशी राहिलेले उर्वरित अर्ज जगताप गटाचे शिवसेना यांच्यावतीने तर बागल गट देवी गट यांचे भाजपच्यावतीने शिंदे गट महायुतीच्यावतीने तर सावंत गटाचे स्वतंत्र मोठ्या उत्साहात दाखल होऊन निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!