महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना (शिवसेना शिंदे गट) संघटनेची अधिकृत घोषणा मुबई येथे कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी तुषार जाधव
श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना (शिवसेना शिंदे) गट या संघटनेची अधिकृत घोषणा दि.20 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आली. हा भव्य कार्यक्रम रंगशारदा,बांद्रा (मुंबई) येथे रात्री 10.30 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उ.बा.ठा भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेशजी मोहिते यांनी श्रमिक कामगार सेना शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश झाला व त्यांची श्रमिक कामगार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अधक्ष्य पदी निवड करण्यात आली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकट व विश्वासू मित्र कौशिक आनंद यांची श्रमिक कामगार सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली
या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदासभाई कदम, शिवसेना सचिव श्री .संजयजी मोरे, तसेच श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे प्रदेश कार्यध्यक्ष श्री.बाबासाहेब चव्हाण, सचिव श्री.अमितजी भटनागर यांच्यासह शिवसेनेचे अनेक मंत्री, खासदार व आमदार, उपस्थित होते.
या घोषणेमुळे महाराष्ट्रातील कामगारांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळेल तसेच श्रमिक वर्गाच्या हक्क आणि हक्कांसाठी संघटना अधिक प्रभावीपणे लढणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांनी व्यक्त केला.
व यावेळी श्रमिक कामगार सेना उत्कृष्ट अशी कामगिरी बजावून श्रमिक कामगार सेनेचा नवलौकिक वाढवून संघटना तळागळापर्यंत पोहोचवून कामगारांच्या न्याय हक्कसाठी आम्ही सर्व कायम सामोरे असु असे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केले


