शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ॲड.बाळासाहेब जरांडे यांची निवड
केत्तूर (अभय माने) श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केतुर-2,(ता. करमाळा,) या विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ॲड.बाळासाहेब जगन्नाथ जरांडे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डी.ए.मुलाणी हे होते.स्वागत व प्रास्ताविक सहशिक्षक केशोर जाधवर यांनी केले.केंद्रप्रमुख विकास काळी यांच्या सूचनेनुसार संवर्गनिहाय इतर सदस्यांची निवड करण्यात आली.सदर विद्यालयात गोयेगाव,केतुर-1,दिवेगव्हाण,पारेवाडी, केतुर-2,पोमलवाडी,गुलमरवाडी, कुंभारगाव, या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत येतात त्यामुळे सदर गावातील पालकातून शालेय व्यवस्थापन समितीची निवड नियुक्ती करण्यात आली, समितीतील इतर सदस्य पुढील प्रमाणे- प्राचार्य डी.ए.मुलाणी,केंद्रप्रमुख विकास काळी, ग्रामपंचायत सदस्य गट प्रशांत नवले (केत्तूर-2), महेश पवार (पारेवाडी), सौ. पल्लवी सोनवणे (गोयेगाव), ॲड.संतोष निकम (केतुर- 2), पैलवान प्रशांत पांढरे (पारेवाडी),शिक्षक प्रतिनिधी के.सी.जाधव, गणेश कोकणे (केतुर -1), सौ.उज्वला निंभोरे (केतूर-2), सौ.कीर्ती पानसरे (केत्तूर-2), लक्ष्मण पांडुरंग खोमणे (गुलमरवाडी), रवींद्र नवले (पारेवाडी), तुकाराम खाटमोडे (देवेगव्हाण), सौ. रेश्मा पाठक (केत्तूर-2) भारती विघ्ने (केत्तूर-2)
निवडीनंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ॲड.बाळासाहेब जरांडे यांचा सत्कार प्राचार्य डी.ए. मुलाणी, मावळते अध्यक्ष अशोक आबा पाटील, माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील,यांच्या हस्ते करण्यात आला. तर सदस्यांचा सत्कार उपस्थित पालकांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला यावेळी मावळते उपाध्यक्ष संतोष राऊत, माजी उपसरपंच हरिश्चंद्र खाटमोडे,शहाजी पाटील, सचिन निंभोरे, ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी कानतोडे, शुभांगी विघ्ने, दिपाली डिरे, सचिन वेळेकर, महेश महामुनी, बाबासाहेब येडे,फाळके,देवकर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सहशिक्षक आर.डी. मदने यांनी आभार मानले.