Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा शहराजवळील बायपास चौकातील उड्डाणपूल काढण्याची मागणी

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराजवळील नगर~सोलापुर राज्यमार्गावरील भरचौकात अर्धवट अवस्थेत असणा-या उड्डाणपुलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.गेल्या अनेक वर्षापासुन या राज्यमार्गाचे काम रखडल्याने हा अर्धवट अवस्थेत असणारा उड्डाणपुल केवळ अपघातास कारणीभुत ठरत आहे.या मार्गावर असणारा करमाळा गावठाणचा भाग तसेच विद्यार्थी व कमलादेवी मंदिराकडे येणारे भाविक तसेच वाहनचालक यांना सतत या अर्धवट उड्डाणपुलाचा त्रास होत आहे.हा उड्डाणपुल भरचौकात असल्याने कोणत्याहि दिशेने येणारी वाहने सहजपने दिसुन येत नाहित.या मार्गावरील अवजड वाहतुक तसेच ऊस वाहतुक करणारी वाहने भरपुर प्रमाणात असतात.यापुर्वी अनेकदा या ठिकाणी अपघात झालेले आहेत.तरी या गोष्टिची तातडीने नोंद घेऊन या उड्डाणपुलाचे अर्धवट बांधकाम तातडीने हटवावे. 

चौकट

या मार्गावर कन्या प्रशाला..कर्मवीर आण्णासाहेब जगताप प्रशाला..महात्मा गांधी विद्यालय..गुरूकुल प्रशाला या शैक्षणिक संस्थाचे विद्यार्थी..तसेच कमलादेवी भक्तगण..माॅर्निंग वाॅक साठी जाणारे नागरीक व अन्य नागरीक यांना या अर्धवट बांधकामाचा मनस्ताप होत आहे. गेली अनेक वर्ष या मार्गाचे काम रखडलेले आहे..तरी संबंधित विभागाने याची तातडीने नोंद घेऊन ही अडचण सोडवावी.

(केतनकुमार इंदुरे~उपाध्यक्ष,करमाळा राष्ट्रवादि काॅ)

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group