पोलीस मित्र संघटना समाज कल्याणासाठी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यामध्ये काम करणार- गफूरभाई शेख
करमाळा प्रतिनिधी पोलीस हे समाजरक्षणाचे कार्य करीत असून समाजामध्ये शांतता राखण्याचे काम करत आहे अशा पोलिसांना त्यांच्या कार्यात पोलीस मित्राची भूमिका महत्त्वाची असून पोलीस मित्र संघटना पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून समाज कल्याणाचे काम करणार असल्याचे मत पोलीस मित्र संघटनेचे तालुका अध्यक्ष गफुरभाई शेख यांनी व्यक्त केले. करमाळा येथे आयोजित पोलीस मित्र संघटनेच्या बैठकीत ते बोलत होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ‘पोलीस मित्र संघटनेच्या सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष सौ विजया कर्णवर यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.पुढे बोलताना ते म्हणाले की पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी गाव तेथे पोलीस मित्र असा उपक्रम पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवणार असून पोलीस मित्र म्हणून गाव पातळीवर ज्यांना काम करायचे आहे त्यांनी पोलीस मित्र संघटनेशी संपर्क साधावा असे आव्हान तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख यांनी केले.
या बैठकीमध्ये विजयाताई कर्णवर जिल्हाध्यक्ष पोलीस मित्र संघटना सोलापूर महिला आघाडी यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा पोलीस मित्र संघटनेचे कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये तालुका उपाध्यक्षपदी संभाजीराव शिंदे तालूका निरीक्षक सौ.मायाताई कदम तालुका कार्यकारीणी सदस्यपदी ज्योतीताई कांबळे अशोकराव जाधव भगवान अण्णा डोंबाळे माजी सरपंच वाशिंबे विष्णू वाघमोडे प्रगतशील बागातदार वाशिंबे यांची निवड करण्यात आली असल्याचे करमाळा तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख यांनी सांगितले.
