करमाळा तालुक्यातील घारगाव चे सुपुत्र श्री संजय सरवदे यांना भैरवनाथ युवक मंडळ वाघोली पुणे यांचेकडून कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित
घारगावप्रतिनिधी
भैरवनाथ युवक मंडळ वाघोली पुणे (रजि.नं.महा/४३२/९९/पुणे) यांचेकडून संजय सरवदे यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
कोरोना काळात बिकट अशा परिस्थितीमध्येस्वतःच्या जीवाची पर्वा न करता covid-19 विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम केले गोरगरिबांना धान्याचे वाटप, तसेच शालेय विद्यार्थ्यांना मास्क वाटप, व गोरगरिबांना जेवण वाटप, कोरोना विषयी जन जागृती , हॉस्पिटलमध्ये पेशंटला मदत कोरोना काळामध्ये अशा अनेक प्रकारच्या सेवा बजवल्यामुळे घारगाव येथील श्री संजय सरवदे यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला भैरवनाथ युवक मंडळ ही गेली 35 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे मंडळ दरवर्षी गणेश उत्सव शिवजयंती दहीहंडी होळी याचबरोबर 15 ऑगस्ट 26 जानेवारी रक्तदान शिबिर संपूर्ण मोफत शारीरिक तपासणी ॲम्बुलन्स सेवा सार्वजनिक पाणपोई, अंगणवाडी ,बस स्टॉप असे अनेक प्रकारचे कार्य हे मंडळ करत असते यावर्षी गणेश उत्सवानिमित्त या मंडळाने अनेक उपक्रम राबविले होते त्यामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर, अंध मुलांचा आर्केस्ट्रा, अंध दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत, ज्येष्ठ नागरिकांना मदत, कोरोना काळामध्ये सेवा दिल्याबद्दल पोलीस, डॉक्टर ,परिचारिका, समाजसेवक यांना पुरस्कार, इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार, पूरग्रस्तांना मदत, वैद्यकीय मदत, वृक्ष वाटप, मनोरंजन पर कार्यक्रम आकर्षक अशी विद्युत रोषणाई शेवटच्या दिवशी पूजा आणि महाप्रसाद आणि भव्य अशी मिरवणूक सोहळा असे अनेक उपक्रम राबविले होते
यावेळी संजय सरवदे यांनी कोरोना काळात केलेल्या सेवेबद्दल भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष श्री शिवदास भाऊ उबाळे माजी सरपंच वाघोली वसुंधरा ताई उबाळे सरपंच वाघोली माजी सभापती पंचायत समिती हवेली यांच्या हस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप दादा उबाळे भानुदास शेठ उबाळे दिनेश उबाळे सोमनाथ उबाळे सचिन उबाळे सागर उबाळे संतोष उबाळे प्रतीक उबाळे गौरव शेठ उबाळे माऊली माथाळे संदीप शेडगे साहिल पोफाळकर व मंडळाचे बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
संजय सरवदे यांनी भैरवनाथ युवक मंडळाचे भरभरून कौतुक केले व आभार मानले.
