पश्चिम भागाचे युवक नेते ॲड अजित विघ्ने यांचा उद्या संजयमामा शिंदे गटात प्रवेश
करमाळा प्रतिनिधी
करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी पश्चिम भागातील सोडविलेला डिकसळ पुलाचा महत्वाचा प्रश्न व इतर विकास प्रिय मुद्द्यावर प्रभावित होऊन पश्चिम भागाचे नेते अॕड अजित विघ्ने येत्या शुक्रवारी आमदार संजय मामा गटात प्रवेश करणार आहेत.करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अभ्यासू आणि जाणकार नेतृत्व, करमाळा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॕड. अजित विघ्ने यांचा शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता नगोर्ली फार्म हाऊस येथे आमदार संजय मामा शिंदे यांचे गटात जाहीर प्रवेश होणार आहे.अॕड अजित विघ्ने हे केत्तुर गावचे माजी सरपंच असून त्यांनी विविध शासकीय कमिटीवर काम केले आहे. सन 2012 साली त्यांनी जगताप गटाकडून पंचायत समितीची निवडणुक ही लढवली होती, शिवसेना नेते शिवाजीराव मांगले, माजी मंत्री दिंगबरराव बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप, यांचेबरोबरही त्यांनी काम केले आहे. ॲड अजित विघ्ने सध्या माजी आमदार नारायण पाटील पटाची सक्रिय कार्यकर्ते असून जिल्हा परिषद पंचायत समिती करता प्रबळ दावेदार आहेत तसेच अतिशय प्रभावी युवक नेते असून आमदार संजय मामा शिंदे यांनी पश्चिम भागातील सोडवलेल्या डिळसळ पुलाचा महत्त्वाचा प्रश्न व इतर विकासप्रिय मुद्द्यावर प्रभावित होऊन आमदार संजय मामा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
