आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे पोफळज येथील विद्यार्थ्यांची एसटीची अडचण दूर झाली दुर- पांडुरंग आबा शिंदे .
करमाळा प्रतिनिधी
पोफळज येथील अनेक शालेय विद्यार्थी कुंभेज येथील माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. सदर विद्यार्थ्यांना प्रशालेत जाणे – येणे साठी अडचण होती .ही अडचण दूर करण्याची विनंती आमदार संजयमामा शिंदे यांना केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याशी संपर्क साधून ही अडचण सोडवली. त्यामुळे पोफळज येथील विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली असल्याची माहिती पांडुरंग आबा शिंदे यांनी दिली.
कुंभेज प्रशालेमध्ये सध्या पोपळज तसेच हजारवाडी या भागातून विद्यार्थी शाळेसाठी येत आहेत .त्यांची होणारी गैरसोय या बसमुळे दूर होणार आहे. ही बस सुरू करण्यासाठी पोपळज गावचे उपसरपंच माननीय श्री पांडुरंग (आबा) शिंदे व चेअरमन राजेंद्र पवार तसेच संतोष पोळ, संतोष पवार, बिभीषण गव्हाणे ,संजय पवार ,अक्षय कुलकर्णी ,बलभीम वाघमारे ,मंगेश कांबळे, परमेश्वर पवार ,सागर कांबळे, धनंजय पवार, विलास कांबळे, पोपट कांबळे ,गणपत शिंदे, कैलास सुरवसे, महादेव सुरवसे, सहदेव सुरवसे ,वेताळ पवार ,संतोष गव्हाणे, शिवाजी क्षीरसागर, तसेच इतर पालक यांचे सहकार्य लाभले.
ही बस सुरू झाल्याबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालय कुंभेज येथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आभार मानले . पोफळज येथे या बसची विधिवत पूजा करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. ही एसटी जेऊर, पोफळज, उमरड, सोगाव या गावांना ही जाते.
