Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

विद्या विकास मंडळ करमाळा या संस्थेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्रदान

करमाळा प्रतिनिधी – करमाळा येथील विद्या विकास मंडळ करमाळा या संस्थेला 31 मे 2025 रोजी कोल्हापूरमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था व शिक्षक मेळावा संपन्न झाला. यामध्ये विद्या विकास मंडळ करमाळा या संस्थेला आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार राज्याचे कुटुंब कल्याण आरोग्य मंत्रीतथा कोल्हापूरचे पालकमंत्री मा.प्रकाश आबिटकर,हातकलंगडे चे खासदार माननीय धैर्यशील माने राज्यसभेचे खासदार माननीय धनंजय महाडिक महाराष्ट्राचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागरमाननीय भास्कर महाराज या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार व शिक्षक मेळावा पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये संपन्न झाला. या महाविद्यालयाच्या
गुणवत्ता,कार्यपद्धतीवर आधारित हा पुरस्कार प्राधान करण्यात आला.महाराष्ट्रातील 40 संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये विद्या विकास मंडळ, करमाळा या संस्थेचाही समावेश होता. या संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,करमाळा हे अनुदानित उच्च माध्यमिक व महाविद्यालय चालवले जाते. विद्या विकास मंडळ या संस्थेमध्ये के.जी. ते पी.जी. पर्यंत शिक्षण दिले जाते. या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात .महाविद्यालयांमध्ये दरवर्षी सातत्याने निकालाची उज्वल परंपरा व उच्च दर्जाचे शिक्षण या मोफत दिले जाते. महाविद्यालयातील एन.सी.सी. व एन.एस.एसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाची व देशाची सेवा करण्याचे बाळकडू दिले जाते. त्यामुळे या संस्थेचा समावेश पुरस्कारामध्ये होता. हा पुरस्कार संस्थेचे सचिव आदरणीय विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड व संस्थेचे सदस्य यांच्यावतीने संस्थेचे विश्वस्त कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख, सोलापूर मा.मनीष कळजे, मा.गणेश शिंदे प्रमुख प्रेरणादायी व्याख्याते,उपमुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. मंगेश चिवटे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब आडसूळ, पंढरपूरचे वासकर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला . या कार्यक्रमाचे संयोजन मा. गणेश चिवटे व एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे राज्यस्तरीय अध्यक्ष प्रा.डॉ. बापूसाहेब आडसूळ यांनी केले होते. या मिळालेल्या आदर्श पुरस्काराबद्दल विद्या विकास मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!