विरोधी नेत्यांपेक्षा दुष्काळ,दुर्लक्षित रस्ते, बेरोजगारी खरे शत्रू श्री.दिग्विजय बागल बागल यांच्या गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद
करमाळा प्रतिनिधी
महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी करमाळा तालुक्यातील केम,पाथूर्डी,बाळेवाडी,तरडगाव,कूर्डवाडी ता माढा या गावांमधून मतदारांच्या भेटीगाठी व नागरिकांशी चर्चा केली.या दौऱ्याला भरघोस पाठिंबा आणि प्रचंड प्रतिसाद मिळत असून गावोगावी प्रचंड उत्साहात स्वागत होत आहे.करमाळा विधानसभेला आता कोणत्याही फेक नरेटीव पेक्षाही विकासाची,सक्षम आणि सुशिक्षित नेतृत्वाची
आस लागल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.करमाळा माढा मतदारसंघात माझे शत्रू विरोधी गटातील व अन्य इतर कोणीही नसून माझा खरा शत्रू या तालुक्यातील दुष्काळ, बेरोजगारी,दूर्लक्षित रस्ते असून हे मला हद्दपार करायचे आहे.संपूर्ण तालुका सिंचनाखाली आणण्यासाठी भरघोस मतांनी निवडून द्या.माझ्या पाठीमागे देशातील व राज्यातील सरकार असणार आहे हे लक्षात घेऊन करमाळ्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आणि आपल्या प्रगतीला पाठबळ देण्यासाठी एक संधी देण्याचे आवाहन बागल यांनी केले.
