मौजे. केत्तुर नं-२ येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीचे प्रशासकांनी तातडीने सुरु करावी- ॲड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी केतुर नं-२ येथील ग्रामपंचायती चा सार्वजनिक पाणीपुरवठा गेल्या महीना भरापासुन विस्कळीत झालेला असुन, सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यावाचुन प्रचंड हाल होत आहेत. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाचे ताब्यात असुन, प्रशासकांनी याबाबत तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. सदर गावातील पाणी पुरवठा योजना तातडीने चालु होणे गरजेचे असुन, याबाबत ॲड.अजित विघ्ने यांनी प्रशासकांना विनंती केलेली असुन त्यांनी दोन दिवसात पाणी पुरवण चालु करणे बाबत त्यांनी आश्वासित केलेची माहीती दिली आहे. उन्हाळ्यामुळे गावातील खाजगी बोअरींग चे पाणी देखिल कमी झालेले असुन, ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा यंत्रणा बंद राहील्या मुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदरचा पाणी पुरवठा तातडीने चालु व्हावा बाबत नागरिकांची मागणी आहे.
