दिगंबरराव बागल पेट्रोलियमने. ग्राहकांची खरी गरज ओळखून सेवा दिली, आता CNG पंपाद्वारेही सर्वोत्तम सुविधा देणार – विलासराव घुमरे सर
करमाळा प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील वाहनधारकांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे तालुक्यात प्रथमच CNG पंप सुरू झाले आहे. यावेळी उद्घघाटनप्रसंगी बोलताना मा. विलासराव घुमरे सर म्हणाले की, ग्राहकांची खरी गरज ओळखूनच सुरुवातीला दिगंबररावजी बागल पेट्रोलियमच्या माध्यमातून इंधन सेवा सुरू करण्यात आली. ग्राहकहित जपून प्रामाणिक सेवा दिल्यामुळे संस्थेला आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात दिगंबरराव बागल पेट्रोलियम हे क्रमांक एकचे केंद्र ठरले आहे. आता CNGच्या माध्यमातूनही ग्राहकांना सेवा देत असल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, माझे सुपुत्र ॲड. विक्रांत घुमरे व आशुतोष घुमरे हेही याच मूल्यांवर काम करत असून अल्पावधीतच ग्राहकांची पसंती आम्हाला मिळाली आहे. CNG पंपाच्या माध्यमातूनही कंपनीवरील विश्वास अधिक दृढ करून सर्वोत्तम व विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
करमाळा तालुक्यातील हा पहिला CNG पंप श्री. दिगंबररावजी बागल पेट्रोलियम, करमाळा येथे शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी ११ वाजता भव्य सोहळ्यात सुरू झाला. हा उद्घाटन सोहळा करमाळा–टेभुंर्णी हायवेवरील देवळाली (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे संपन्न झाला.
उद्घाटन सोहळा मा. विलासराव घुमरे सर यांच्या शुभहस्ते पार पडला, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मकाईचे माजी चेअरमन श्री. दिग्विजय दिगंबररावजी बागल, सोहळ्यात प्रमुख पाहुणे व मान्यवर. म्हणून श्री. हर्दीक शहा साहेब GA ग्रेड, IMC सोलापूर मा. श्री. मंथन शहा साहेब (मार्केटिंग डेव्हलपमेंट, IMC सोलापूर मा. श्री. अजित कुमार साहेब (इलेक्ट्रिकल हेड, IMC)मा. श्री. शिवमूर्ती साहेब (ऑस्टिन टेड, IMC) मा. श्री. विक्रम भोसले साहेबमा. श्री. मयूर स्वामी साहेब (IMC)मा. श्री. अमित कलंगुटकर साहेब (रिसर मॅनेजर, HPCL सोलापूर)मा. श्री. अभिजित कांबळे साहेब (इंजिनिअर ग्रेड, HPCL सोलापूर)मा. श्री. हेमंत मिना साहेब (HPCL सोलापूर)मा. श्री. अक्षय टेंभूर्णे साहेब (सेल्स ऑफिसर, HPCL सोलापूर) विलासराव घुमरे सर यांच्या धर्म पत्नी सौ जयश्रीताई विलास घुमरे ,ॲड. श्री. विक्रांत विलासराव घुमरे सौ प्रियांका आशुतोष घुमरे श्री. आशुतोष घुमरे प्राचार्य मिलिंद फंड सर प्राचार्य अभिमन्यू माने सर माजी प्राचार्य जयप्रकाश बिले सर, मकाईचे माजी व्हाईस चेअरमन संचालक बाळासाहेब पांढरे ,नागेश माने उपप्राचार्य संभाजी किर्दाक चंद्रशेखर शिलवंत सर उपनगराध्यक्ष अतुल फंड महादेव फंड,नगरसेवक दिपक चव्हाण विजय घोलप,सूनील बनसुडे प्रशांत ढाळे,पप्पू शेठ सिंधी यशवंत परिवाराचे सर्व सदस्य अशोक शेठ दोशी, प्रा. राजेश शिंदे झरेचे सरपंच शिवाजी पिसाळ मा.सरपंच अर्जुन गुळवे मा.जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील उद्योजक संतोष काका कुलकर्णी विजयराव बिले प्रशांत शेटे सर रितेश कटारिया ,सुरताल संगीत विद्यालयचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर ह भ प बाबासाहेब साबळे महाराज मॅनेजर ज्ञानेश पाटोळे राहुल बाबर सर्व कर्मचारी अनेक नागरिक व स्थानिक मान्यवरही सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
CNG पंपाच्या सुरूवातीमुळे करमाळा, देवळाली आणि आसपासच्या परिसरातील वाहनधारकांना आता स्वच्छ, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक इंधनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या नव्या उपक्रमाचे स्वागत केले असून दिगंबरराव बागल पेट्रोलियमच्या नव्या पावलाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


