करमाळयात कांदयाला हमी भाव मिळण्यासाठी रस्ता रोको आंदोलन संपन्न
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील जामखेड बायपास चौकात सावंत गटाच्या वतीने सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्याच्या शेतकरी च्या वतीने सकाळी अकरा वाजता रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे नेते संजय शिंदे राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष हनुमंत मांढरे,भा,रि,प चे देवा लोंढे भिमदल चे सुनील भोसले करमाळा विविध कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष मनोज गोडसे, माजी सरपंच विठ्ठल शिंदे, बालाजी अंधारे,आप्पा झिंजाडे बबन जाधव, गणेश अंधारे पानाचंद झिंजाडे बाबुराव आढाव,मल्हारी भांडवलकर पप्पू शिंदे,बंडु झिंजाडे लखन झिंजाडे सुनील काळे, दिनेश पुणेकर शाहीर घोडके,शाम महाडीक , दादासाहेब इंदलकर नितिन बागल संतोष बनकर अनिल इरकर विठ्ठल इवरे , दस्तगीर पठान चंद्रकांत मुसळे मार्तण्ड सुरवसे रमेश हवालदार एच आर पाटिल आनंद रोड़े मयुर घोलप योगेश काकडे संजय नाळे साजीद बेग मंहमद बागवान आलीम पठान महेश भागवत वाजीद शेख राजु नालबंद नागेश उबाळे शहाजी धेंडे अकबर बेग शिवाजी बनकर राहुल तपसे दिलीप चव्हाण खलील मुलाणी गोविंद किरवे रामा कंरडे नितिन माने सचिन सामसे शिवाजी नरूटे दिपक सुपेकर फारुक जमादार जावेद शेख आसीम बेग अरबाज बेग समीर दाऊद शेख आदी शेतकरी उपस्थित होते
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की,करमाळा तालुक्यातील शेतकरी ची आज एकजुट दिसल्यामुळे कृषी मंत्री नी दौरा रद्द केला असून महाराष्ट्र सरकार चे शेतकरी कड़े लक्ष नाही सध्या कांदयाला दोन रुपये किलों दर आहे महागाई प्रंचड प्रमाणात वाढलेली आहे महाराष्ट्र सरकार ने नाफेड ची घोषणा अधिवेशनात केली परंतु अदयाप पर्यंत त्याची अंमलबजावणी नाही शेतकरी ना न्याय मिळवुन देण्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही लाठया खाऊं परंतु शेतकरी ना न्यायच मिळवुन देऊ तसेच अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकरी ना त्वरित भरपाई तातडीने देण्यात यावी डिझेल पेट्रोल चे दर कमी करण्यात यावे से सरकार शेतकरी कड़े दुर्लक्ष करत आहे असे ते यावेळी म्हणाले
यावेळी मनोज राखुंडे देवा लोंढे, हनुमंत मांढरे आदीची भाषणे झाली
यावेळी कृषि अधिकारी वाकडे यांनी सांगीतले की, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी ची यादी ग्रामपंचायत ला लावलेली आहे त्याची लवकरच तपासणी करुन शेतकरी च्या खात्यात त्वरित रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच यावेळी सहायक निबंधक दिलीप तिजोरे उपस्थित नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले होते त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला
यावेळी नायब तहसीलदार गायकवाड़ कृषि अधिकारी वाकडे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, मंडलाधिकारी राऊत,तलाठी जवणे पो,काॅ,जाधव,उबाळे,कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलन दरम्यान वाहनाची पाच कि,मी,रांग लागली होती यावेळी बहुसंख्य शेतकरी आंदोलक उपस्थित होते
