Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा युनिटच्यावतीने पत्रकार दिन साजरा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा *लेखणी (पेन)* देऊन एक आगळा वेगळा पत्रकार दिन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील विविध दैनिक साप्ताहिक पाक्षिक वर्तमानपत्रांच्या पत्रकारांचा व विविध इलेक्ट्रॉनिक मेडिया (न्यूज पोर्टल) च्या पत्रकार बंधूचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुकाध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे संघटक मा. चक्रधर पाटील सर सह-कोषाध्यक्ष मा. अजिम खान यांच्या हस्ते पुढील पत्रकार बंधूचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मा. संजय शिंदे मा. राजेश गायकवाड मा. संजय चौगुले मा. गजेंद्र पोळ मा. पाखरे साहेब मा. अशोक मुरुमकर मा. दिनेश मडके मा. मुजावर साहेब मा. विशाल परदेशी मा. नागेश चेंडगे मा. या इत्यादी पत्रकार बंधू उपस्थित होते.
यावेळी तालुका अध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे सर यांनी आपले मनोगतात पत्रकार बंधूच्या माध्यमांतून समाजातील अनेक प्रशानांना वाचा फोडण्यात येत असलेबाबत समाधान व्यक्त केले. यापुढेही असेच समाज जागृतीचे व जनहिताचे प्रश्न आपल्या लेखणीतून यावेत. तसेच आमची ग्राहक पंचायत ही जनहितार्थ अनेक विषयांवर मार्गदर्शन व कार्यक्रम आयोजित करत असते त्याचीही प्रसिद्धी आपल्या माध्यमातून समाजा पर्यत जावी ही अपेक्षा व्यक्त करुन त्यांना या पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.शेवटी मा. संघटक श्री चक्रधर पाटील सर यांनी सर्वाचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group