टी.सी. कॉलेज बारामती येथे झालेल्या खुनातील आरोपींवर जास्तीत जास्त कडक कार्यवाही व्हावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी भेट घेऊन केली मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील ओंकार संतोष पोळ हा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती (टी.सी. कॉलेज) येथे शिक्षण घेत होता. काही किरकोळ कारणावरून कॉलेज मध्ये भांडण झाले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यावेळी तो मृत्यूमुखी झाला. या भ्याड हल्ल्याचा करमाळा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो तसेच बारामती हे महाराष्ट्रातील विद्येचे माहेर घर समजले जाते. अनेक राज्यातील व जिल्हयातील विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात आणि अशा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे बारामती सह आपल्या महाराष्ट्राच नाव खराब होत आहे. अशा प्रकारे भ्याड हल्ला करणाऱ्या नराधमांना जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी यासाठी आपण आपल्या स्तरावर आदेश द्यावेत. तसेच ओंकार संतोष पोळ याला मरणोत्तर न्याय मिळवून द्यावा अशा विनंतीचे पत्र आज मंत्रालय मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे सर्वेसर्वा अजित पवार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी दिले तसेच सोशल मिडीयावर आरोपींचे मित्र परिवार इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून पोस्ट टाकून दहशद माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. यांच्यावर ही कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी अजित पवार यांनी याप्रकरणातील आरोपींनवर कडक कार्यवाही करण्यासाठी आदेश दिलेले आहेत तसेच कोणीही दहशत माजवत असेल आणि भ्याड हल्ले करत असेल तर तो कोणीही असो त्याला सोडणार नाही त्याच्यावर कार्यवाही करणार असे कडक शब्दात सांगितले.
