करमाळाकृषी

करमाळा बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयवंतराव जगताप ,उपसभापती पदी शैलजा मेहेर यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी करमाळा बाजार समितीच्या सभापती पदी माजी आमदार जयवंतराव जगताप विजयादशमीच्या मुर्हूतावर सिमोल्लंघन करत सहाव्यांदा विराजमान झाले आहेत . तर प्रथमच महिला उप सभापती होण्याचा मान सौ . शैलजा मेहेर यांना मिळालेला आहे . करमाळा बाजार समितीच्या इतिहास प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली आहे . प्राधिकृत अध्यासी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभापती व उपसभापती निवडीसाठी सभेचे आयोजन बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आले होते . सभापती पदासाठी माजी आमदार जगताप व उपसभापती पदासाठी सौ .मेहेर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या अविरोध निवडी घोषित झाल्या . बाजार समितीवर स्थापनेपासून जगताप गटाचे वर्चस्व असून सर्वाधिक प्रदीर्घ काळ सलग २९ वर्षे जगताप यांनी बाजार समितीचे सभापती पद भूषविले आहे . सभेस बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप , महादेव कामटे , जनार्धन नलवडे , रामदास गुंडगीरे , सागर दोंड , तात्यासाहेब शिंदे , नागनाथ लकडे , शिवाजी राखुंडे , सौ . साधना पवार, नवनाथ झोळ , काशीनाथ काकडे ,कुलदीप पाटील , बाळू पवार , मनोज पितळे , परेश दोशी , वालचंद रोडगे उपस्थित होते . निवडीनंतर जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण केली . यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी , व्यापारी उपस्थित होते .माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील , खासदार रणजीत सिह नाईक निंबाळकर , बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत , करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे , माजी आमदार नारायण पाटील , दिग्विजय बागल आदींनी अभिनंदन केले आहे . निवडीनंतर माजी आमदार जयवंतराव जगताप , ॲड .कमलाकर वीर , आण्णासाहेब काळे , नवनाथ झोळ , बबनराव मेहेर , सागर दोंड यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्तविक अशोक नरसाळे यांनी केले .सभेच्या शेवटी आभार सचिव विठ्ठल क्षिरसागर यांनी मानले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!