खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात पाहणी दौरा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केम परिसरात माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाहणी केली, व संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले,
यावेळी केम परिसरातील शेतकऱ्यांनी पूर्ण तालुका अतिवृष्टी बाधित झाला आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी खासदार साहेबांकडे केली यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करू असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले ,
यावेळी तहसीलदार समीर माने , भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे,केमचे सरपंच अजित तळेकर, , कृषी अधिकारी वाकडे साहेब, करमाळा पोलीस स्टेशनचे साने साहेब, भाजपा उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, बाळासाहेब कुंभार, अशोक ढेरे, अमोल पवार, सर्व मंडळाचे सर्कल, तलाठी ,ग्रामसेवक, सरपंच तसेच केम येथील गणेश तळेकर, सागर नागटिळक, धनंजय ताकमोगे, विकास कळसाईत आदी शेतकरी उपस्थित होते,
