शिवसेना तालुकाप्रमुख पदी राहुल कानगुडे यांची नियुक्तीसंपर्क नेते संजय मशिलकर यांनी दिले नियुक्तीपत्र
करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या आदेशाने शिवसेनेने तालुकाप्रमुख पदी राहुल कानगुडे यांची निवड केली आहे.नियुक्तीचे पत्र शिवसेना संपर्क नेते संजय मशीलकर यांनी दिले आहे.यावेळी शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश नाना साठे जिल्हाप्रमुख चरण चौरे मनीष काळजी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील ,माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे,उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील करमाळा शहर प्रमुख संजय शीलवंत युवासेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंडसोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे शहर प्रमुख मनोज शेजवळ युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठी आधी जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.या निवडीचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी स्वागत केले असून आगामी काळात राहुल कानगुडे यांचे नेतृत्वाखाली करमाळा तालुका शिवसेना मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
