बीटस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटीचे घवघवीत यश
करमाळा प्रतिनिधी डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय गौंडरे येथे आठ डिसेंबर रोजी जि प शाळेचा करमाळा-२ च्या बीट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या .
या स्पर्धेत जि प शाळा घोटीने घवघवीत यश मिळवले . सदर स्पर्धेत लहान गट *मुले व मुली* या दोन्ही संघांनी *कबड्डी, खो-खो , लंगडी* या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच मोठ्या गटातील मुलींनीही खूप खूप खोखो खेळात प्रथम क्रमांक मिळवला.
लहान गट धावणे 100 मीटर प्रतीक्षा कांबळे प्रथम क्रमांक
200 मीटर महादेव राऊत द्वितीय क्रमांक
मोठा गट धावणे 200 मीटर बाळकृष्ण राऊत प्रथम क्रमांक मिळवला.
या सर्व खेळाडूंना श्री.भारत ठाकर , श्री.सचिन शेंडे श्री.शिवाजी लोकरे व बाळासाहेब शिंदे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .
मुख्याध्यापक श्री शिवाजी फरतडे सर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री. प्रमोदकुमार म्हेत्रे व उपाध्यक्ष श्री नवनाथ राऊत व सर्व सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले .