विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 2023 निमित्त बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
करमाळा प्रतिनिधी शिव फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समिती आयोजित संस्थापक माननीय नागेश दादा कांबळे यांच्या उपस्थितीत बुद्धिबळ स्पर्धेचे करमाळा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक मा. सुनील सावंत ,सचिन साखरे, वाय.सी.एम .कॉलेजचे माजी प्राचार्य मा. नागेश माने पृथ्वीराज देशमुख, नेरुसर, जगदीश शिगची ,अमोल जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला*
शिव फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक आदरणीय नागेश दादा कांबळे अध्यक्ष लक्ष्मण भोसले माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ आर.पी.आयचे सोलापूर जिल्हा युवकाध्यक्ष यशपाल कांबळे पत्रकार प्रफुल्ल दामोदर यांनी ,वयोवृद्ध स्पर्धकासहित सर्वांचा सत्कार करून स्वागत केले
यावेळी उस्मानाबाद, बार्शी, माळशिरस, परांडा, बारामती, सोलापूर या ठिकाणाहून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता या सर्व कार्यक्रमासाठी एल.आय.सी प्रतिनिधी व शिव फुले शाहू आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कॅशियर प्रसन्नजीत कांबळे सह कॅशियर प्रमोद गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
