तरटगावच्या सरपंच श्रीमती रजनी जगदाळे व सोसायटीचे चेअरमन सुदामशेठ लेंडवे – पाटील यांचा माजी आमदार जगताप यांचे शुभहस्ते सत्कार संपन्न
करमाळा प्रतिनिधी तरटगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आलेल्या नुतन सरपंच श्रीमती रजनी जगदाळे, सदस्य अभिजीत पाटील, अवधुत घाडगे, सौ .अनुजा जाधव, सौ .ज्योती मोरे तसेच तरटगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन सुदामशेठ लेंडवे – पाटील, व्हा .चेअरमन सौ . मीना पडवळे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली . यावेळी माजी आमदार जगताप यांनी नूतन सरपंच, सदस्य, सोसायटी चे चेअरमन यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी माजी उपायुक्त प्रभाकर जगदाळे, शरद नलवडे, तात्यासाहेब पाटील, कैलास पाटील,रवी घाडगे यांचे सह तरटगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. .
