Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्याच्या विकास कामांसाठी व प्रगतीसाठी मी सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्याच्या विकास कामांसाठी व प्रगतीसाठी मी सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असून आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजे माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराजी बागल मामा यांच्या कार्यपद्धती प्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या नेहमी संपर्कात राहून कार्यरत रहा तसेच भविष्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहकार्य राहील असा आश्वासक दिलासा राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी आज मकाईचे माजी चेअरमन व सोलापूर जिल्हा शिवसेना युवा नेते दिग्विजय बागल यांना मुंबईत दिला. आज मुंबई मंत्रालय येथे मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील विविध विकास कामांबाबत मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथरावजी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीदरम्यान दोघांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन या महत्त्वाच्या योजनेच्या सव्र्हे कामाला लवकर सुरुवात करून योजना गतीने पूर्ण करण्याची विनंती यावेळी श्री बागल यांनी एकनाथरावजी शिंदे यांना केली त्याला श्री शिंदे साहेब यांनी होकारात्मक प्रतिसाद दिला. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था नजरेला आणून देऊन तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामाला निधी मंजूर करण्याची विनंती केली. करमाळा शहरातील विस्कळीत व दूषित पाणीपुरवठा शहरातील स्वच्छतेबद्दल प्रशासनाची उदासीनता, महावीर उद्यानाची दुरावस्था, शहरातील वाहतुकीची कोंडी इत्यादी प्रश्नासोबतच करमाळा एस टी आगाराच्या ढिसाळ प्रशासन काल बाह्य व नादुरुस्त झालेल्या बसेस त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास नादुरुस्त बसेसमुळे शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा महाविद्यालयात जाता येत नाही. याकरता नवीन बसेसची नितांत आवश्यकता असल्याचे श्री बागल यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिग्विजय बागल यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला अगदी कमी वेळ मिळूनही चांगली मते घेतल्याबद्दल कौतुक केले व भविष्यातील सर्व निवडणुकीत व विकास कामाकरिता मी आपल्या निश्चित पाठीशी राहील असे अभिवचन दिले नंतर दिग्विजय बागल यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय जी सामंत यांची भेट घेऊन करमाळा एमआयडीसीमध्ये तातडीने उद्योग सुरू व्हावेत व एमआयडीसी मधील रस्ते पाणी वीज याबाबतच्या सुविधा लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही व्हावी असे निवेदन दिले. त्याच बरोबर संसद सदस्य व विद्यमान खासदार माननीय श्रीकांत शिंदे विधान परिषद सदस्य आमदार मनीषाताई कायंदे माजी मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब इत्यादींची सदिच्छा भेट घेतली आजच्या सर्व गाठीभेटींमध्ये सर्वच मंत्रिमहोदयांशी तालुक्याच्या विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा करून होकारात्मक प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया श्री बागल यांनी यावेळी दिली. यावेळी मकाईचे संचालक आशिष गायकवाड व मार्केट कमिटीचे संचालक कुलदीप पाटील उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group