पुर्व सोगावच्या खराब रस्ता दुरूस्तीसाठी ग्रामस्थाची एकजुट लोकवर्गणीतुन रस्ता दुरूस्तीचे काम चालु
प्रतिनिधी वाशिंबे.
पुर्व सोगाव ते ऊमरड ४ किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरीकांसह विध्यार्थ्यांना खड्ड्यातुन मार्ग काढून प्रवास करावा लागत होता.याप्रश्नी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.या सर्व गोष्टींना कंटाळून आणि शासनाच्या मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी एक लाख रुपये लोकवर्गणी करुन रस्त्यालगतची झुडपे काढून मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम चालू केले आहे.यामुळे ऊस वाहतूकीसह व प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहनचालकांचा त्रास कमी व्हायला मदत होणार आहे.या कामी प्रा.रामदास झोळ,नेमिनाथ सरडे,अतुल गोडगे,ब्रम्हदेव सरडे, ज्ञानेश्वर गोडगे,भाऊसाहेब राखुंडे,रेवन गोडगे,भागवत मांढरे,तानाजी राखूंडे,बापू चोरमले,गणेश चौधरी, धनंजय गोडगे
यांचे सहकार्य लाभत आहे.
चौकट.
पूर्व सोगाव ते ऊमरड रस्त्यासंदर्भात आमदार, खासदार,सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता करण्यासंदर्भात मागणी केली. परंतु अद्याप पर्यंत कुणीही याची दखल घेतली नाही. लोकवर्गणीतून ४ किलोमीटर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले
अतुल गोडगे.
ग्रामस्थ पूर्व सोगाव
