डिकसळ पुलावरी बँरीकेटर्स अज्ञातांनी हटवले. बांधकाम विभाग म्हणतेय पुन्हा बसवणार
प्रतिनिधी सुयोग झोळ वाशिंबे
कोंढारचिंचोली ता. करमाळा येथील भीमा नदीवरील ब्रिटिश कालीन पुल जड वाहतूकीसाठी धोकादायक बनल्यामुळे अवजड वाहतुक होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवार दि.११ रोजी लोखंडी बँरीकेटर्स लावून बंद करण्यात आला.
परंतु अवघ्या चारच दिवसात अज्ञातांनी शुक्रवार दि.१४ च्या रात्री लोखंडी बँरीकेटर्स गँस कटरच्या सहाय्याने कापून काढले.त्यामुळे बँरीकेटर्स साठी झालेला शासकीय निधी वाया गेला आहे.साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असुन ऊस वाहतूकीच्या उद्देशाने हा प्रकार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.त्यामुळे प्रशासनाने तपास करुन संबधितांवर गुन्हा दाखल करून बँरीकेटर्स ची दुरुस्ती करण्याची मागणी कोंढारचिंचोलीचे मा.सरपंच देविदास साळूंके यांनी केली आहे
चौकट.
बँरीकेटर्स काढल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी पाहणी केली आहे.जेसीबी व गँस कटरने बँरीकेटर्स काढल्याचे निदर्शनास आले.उपअभियंता के.एम.ऊबाळे यांच्याकडे अहवाल सादर केला आहे.वरीष्ठ गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेतील.त्यानंतर बँरीकेटर्स बसवण्यात येईल.
सुनीलकुमार वाघ.
शाखाअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा
