घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना राज्यस्तरीय आपले मानवाधिकार नारी शक्ती पुरस्कार 2022 जाहीर
घारगाव प्रतिनिधी
आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना प्रोत्साहनपर संवेदना म्हणून आपले मानवाधिकार राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असून पुरस्काराचे हे २ रे वर्ष आहे. आपले मानवाधिकार फाउंडेशन तसेच महाराष्ट्रातील इतर सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक संस्थांच्या सहकार्याने आपले मानवाधिकार जनता दरबार, अंधश्रद्धा मुक्त अभियान, भ्रष्टाचार मुक्त अभियान, संविधान जनजागृती अभियान, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरूद्ध लढा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन अभियान, आरोग्य शिबिर, शैक्षणिक व्याख्यान व मार्गदर्शन, ई… सामाजिक उपक्रम राबवले जातात.
आपण करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपले मानवाधिकार फाउंडेशन कडून आपल्याला आपले मानवाधिकार नारी शक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे असे
आपले मानवाधिकार फाउंडेशनचे संचालक डॉक्टर दीपेश पष्टे यांनी निवडीचे पत्र देऊन कळविले आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, विद्यमान सरपंच अनिता राजेंद्र भोसले, उपसरपंच सतीश अंगद पवार, माजी सरपंच सौ लोचना नागनाथ पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्तुद, आशा देशमुखे, कविता होगले, समस्त घारगावकर ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व मित्र परिवारा बरोबरच आप्तेष्टांनी त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सर्व समाज उपयोगी आम्ही ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच यांच्या सहकार्याने करत असतो.त्यांच्या या सामाजिक कामात पती संजय सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असे लक्ष्मी सरवदे यांनी सांगितले आहे.
