देशभक्त स्व.जगन्नाथ कृष्णाजी भोईटे यांच्या स्मृतीदिनानिम्मित २ सप्टेंबर रोजी पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत लसीकरण शिबीर कार्यक्रम संप्पन
वाशिंबे. प्रतिनिधी वाशिंबे येथे देशभक्त स्व.जगन्नाथ कृष्णाजी भोईटे यांच्या स्मृतीदिनानिम्मित २ सप्टेंबर रोजी जे.के.फाउंडेशन तर्फे अमोल भोईटे यांनी पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत लशीकरण शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रतिमेचे पुजन करून आलेल्या मान्यवरांनी विन्रम अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी करमाळा पंचायत समिती पशुसंर्वधन विकास अधिकारी, नेते नवनाथ बापू झोळ, भाजपा नेते अमोल पवार,ह.भ.प.माऊली महाराज झोळ,ह.भ.प.आप्पा महाराज राऊत,रामदास बप्पा झोळ,यांनी भोईटे गुरुजी यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. सुदर्शन नवनाथ झोळ,यादव सर,शिंदे सर,नानासो झोळ,अजित झोळ, किरण झोळ,सुभाष झोळ,संदिप झोळ,अशोक वाघमोडे,अकुंश यादव प्रशांत पवार,व करमाळा तालुक्यातील सर्व पुशधन डॉक्टर टिम उपस्थिती होते.त्यानंतर वाशिंबे परिसरातील शिवारातील बैल,गाई,शेळ्या असे घटसर्प २०० लस व औषध्योउचार देण्याची मोहिम राबवण्यात आली.यावेळी डॉ.मंगेश तुकाराम झोळ यांची सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावर पदोन्नोती झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. याकार्यक्रमाचे नियोजन सचिन भोईटे यांनी केले.
