मकाई साखर कारखान्याचे कर्मचारी सुभाष सरडे यांचे दुखःद निधन
करमाळा प्रतिनिधी करंजे येथील सुभाष व्यंकट सरडे (वय 50) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. ते मकाई साखर कारखान्याचे कर्मचारी होते. बुधवारी (ता. 21) शेतात ते गवत काढत असताना त्यांच्या हाताला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला.पत्नी व ते शेतात गवत काढत होते. सर्पदंश होताच त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर त्यांना करमाळा येथे रुग्णालयात दाखल केले दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे श्वविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, आई, दोन मुले, दोन भाऊ, भावजई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
