माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण… मुख्यमंत्री महोदयांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची आरती करण्याचं भाग्य आज लाभले
मुंबई प्रतिनिधी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण.. मुख्यमंत्री महोदयांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची आरती करण्याचं भाग्य मला लाभले. असे मत महाराष्ट्र राज्य वैद्यकिय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केले. फक्त मीचनाही , तर माझ्या प्रमाणे अनेकांना यावर्षी प्रथमच आरती करण्याचे भाग्य लाभले….आपल्या लहानातील लहान कार्यकर्त्यांवर पितृतुल्य प्रेम करणारा नेता असल्याने हे भाग्य नशिबी आले….महाराष्ट्रातील तमाम जनतेवर अगदी याच प्रमाणे गुरुवर्य मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब प्रेम करत आहेत….आदरणीय भाईंच्या हातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि आरोग्यदायी होऊ दे, सर्वांना चांगले आयुष्य दे अशी मनोभावे प्रार्थना बाप्पाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.