ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा चा क्रिडा सप्ताहाची सांगता क्रिकेटने संप्पन
करमाळा प्रतिनिधी 25 डिसेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2023 या दरम्यान ग्लोबल सायन्स इन्स्टिटय़ूट करमाळा येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात 25 डिसेंबर ला दुपारी 2 वाजता झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मा महेश निकत सर यांनी भूषविले.व त्यानंतर मैदानात श्रीफळ फोडून या क्रिडा साप्ताहिका चा श्रीगणेशा केला.
यानंतर कार्यक्रमांमध्ये विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रांगोळी, कबड्डी,खो-खो , हॉलीबॉल रनिंग, लांब उडी, बॅडमिंटन, लंगडी , ,सुर फाट्या ,बुद्धिबळ आणि क्रिकेट च्या सामने घेऊन या सप्ताहाचा शेवट करण्यात आला.शेवटच्या दिवसशी श्री . संजय चौधरी सर , श्री संभाजी किर्दाक सर उपप्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाला करमाळा , विनय ननवरे सरपंच बोरगाव ,सौ.विजया मॅडम यांनी श्रीफळ फोडून सामना सुरू केला.याप्रमाणे अनेक आधुनिक व पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वर्ग इयत्ता आठवी ते बारावी च्या विविध विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
वरील सर्व क्रिडा सप्ताह मध्ये. संस्थेच्या कांबळे सर ,बोरुडे सर , बनसोडे मॅडम, भोसले सर ,शिंदे सर,निकत मॅडम, कांबळे मॅडम व इतर सर्व शिक्षकांनी मोलाची कामगिरी बजावली.
