अनाथ मुलांसमवेत दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
करमाळा प्रतिनिधी: स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २१ जुलै २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सदर वाढदिवसाचे औचित्य म्हणनू श्री राणादादा यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम म्हणून त्यांच्याच संकल्पनेतून वाढदिवसाची सुरूवात संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपटयांचे वृक्षारोपण करून करण्यात आले. सदर वृक्षारोपण
कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच श्री. राणादादा सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी जपवणूक करता यावी म्हणून कुरकुंभ, ता. दौंड येथील अविश्री बालसदन अनाथ आश्रमातील मुलांना पावसाळी रेनकोटचे तसेच जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले व उपस्थित सर्व मुलांच्या हस्ते केक कापण्यात आला व सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर श्री राणादादा यांनी त्या मुलांना दिलेल्या संदेशाचे व त्यांच्याप्रती असलेली आत्मीयता कशाप्रकारे व्यक्त केली जाते तो त्यांनी दिलेल्या संदेशासोबत उपस्थित सर्व मुलांना वाचून
दाखविण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रा. रवि होले, प्रा. उमेश अनभुले, प्रा. लखन देवकाते व आश्रमातील प्रदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारे एक सामाजिक उपक्रम राबवून दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
