Friday, April 25, 2025
Latest:
Uncategorized

महादेव आण्णा फंड यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी -राजुकाका शियाळ

करमाळा प्रतिनिधी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर लोकनेता होणाऱ्या महादेव आण्णा फंड यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे असे मत प्रसिद्ध व्यापारी राजू काका शियाळ यांनी व्यक्त केले माणुस आज स्वतःच्या सुखासाठी धडपड करत आहे अशा स्वार्थी दुनियेत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करुन आधार बनलेल्या महादेव आण्णा फंड यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे . जनतेचे नगरसेवक महादेव फंड यांचा वाढदिवस 29 डिसेंबर रोजी महादेव आण्णा फंड मित्र मंडळ यांच्या वतीने राजयोग हॉटेल येथे मोठ्या उत्साहात आनंदात संपन्न झाला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी महादेव अण्णा फंड मित्र मंडळाचे वतीने महादेव अण्णा चा वाढदिवस आनंद उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. प्रत्येकाच्या मदतीला दिवस रात्र धावून जाणारा संकट समयी सगळ्यांना मदत करणारा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनेकांच्या मनावर अधिराज्य करणारा एक सच्चा मित्र म्हणून महादेव फंड यांची ओळख आहे.महादेव अण्णा फंड यांना मानणारा वर्ग सर्व‌ जाती धर्माचा असुन माणुसकी हाच खरा धर्म आहे या त्यांच्या कार्यातुन दिसुन येते. या वाढदिवस कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन डॉ महेशचंद्र वीर नानासाहेब मोरे संतोष पोतदार गुरुजी लक्ष्मण लष्कर गुरूजी महेश गवळी यांनी केले होते.
महादेव आण्णा फंड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार मित्र परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ देऊन केक कापून करण्यात आला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर टायगर ग्रुप चे अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे प्रसिद्ध व्यापारी राजू काका शियाळ बाळासाहेब नरारे सर संतोष जगताप डॉक्टर महेशचंद्र वीर उपस्थित होते. लक्ष्मण लष्कर गुरुजींनी वाढदिवसानिमित्त गीत गायन करून रसिकाची मने जिंकली .या कार्यक्रमास ॲड सुहास मोरे पत्रकार डी.जी पाखरे दिनेश मडके सुदर्शन पाटील,हर्षद वीर संतोष जगताप, दत्तात्रय कांबळे,सलीम तांबोळी,अजय निर्गुणकर संतोष बादाडे राजेंद्र हेगडे डॉक्टर विजय गादिया विश्वास काळे पाटील दिलीप चव्हाण कुकडे टेलर संतोष भोसले नवनाथ क्षिरसागर भोजराज फंड, इम्तियाज शेख,दिपक किरवे बाबर गुरुजी चक्रधर पाटील सर कांबळे गुरूजी चंद्रकांत फंड यांच्यासह महादेव अण्णा फंड मित्र मंडळाचे सर्व सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.या चे सूत्रसंचालन संतोष पोतदार गुरुजी यांनी केले तर स्वागत आभार डॉक्टर महेशचंद्र वीर यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group