Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी  कार्यकर्त्यांना विचारात घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेणार – मा.आ.जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी
सत्ता मिळाली तरी अहंकार नाही आणि पराभव आला तरी खचून न जाता जनतेशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करणे हीच आपली भूमिका राहिली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथे जगताप गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. करमाळा येथील यशोदिप मंगल कार्यालयात पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जालिंदर पानसरे होते.
मार्गदर्शन करताना जगताप म्हणाले की, निवडणूक ही लोकशाहीतील नियमित प्रक्रिया असून विजय-पराभवाला समतोलपणे सामोरे जाणे आवश्यक आहे. करमाळा तालुक्यातील शेतकरी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो असून, पुढील काळातही हे काम सातत्याने सुरू राहील.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी युती व उमेदवार निश्चित करताना कार्यकर्त्यांच्या मताला प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भात मोहिते-पाटील तसेच आमदार नारायण पाटील यांच्याशी चर्चा करून जागावाटपात जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उत्साह निर्माण झाला असून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष अमोद संचेती, वैभवराजे जगताप, दीपक ओहोळ, नगरसेवक प्रशांत ढाळे, रोहिदास आलाट शिवराज जगताप, शंभूराजे जगताप, अहमद कुरेशी, नागनाथ लकडे, दादासाहेब लबडे, जनार्दन नलवडे, शहाजी शिंगटे, महादेव कामटे, महादेव डुबल, शिवाजी राखुंडे, रामदास गुंडगिरे, विष्णू पारखे, तात्यासाहेब शिंदे, सागर दोंड, हनुमंत ढेरे, दादासाहेब कोकरे, आनंद शिंदे, औदुंबर मोरे आदी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!