करमाळा

दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस मुकबधीर विद्यार्थ्यांसमवेत साजरा

करमाळा प्रतिनिधी: स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २१ जुलै २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सदर वाढदिवसाचे औचित्य म्हणनू श्री राणादादा यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम म्हणून त्यांच्याच संकल्पनेतून वाढदिवसाची सुरूवात संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपटयांचे वृक्षारोपण करून करण्यात आली सदर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच समाजातील शारिरिक विकलांग असलेल्या घटकासाठी सतत पुढाकाराने लक्ष देवून मदतकार्य करणाऱ्या श्री. राणादादा सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्‍हावागज, ता. बारामती येथील निवासी मुकबधिर विद्यालयामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले व उपस्थित मुकबधिर मुलांच्या हस्ते केक कापून व सर्व मुलांना खाऊचे वाटप करून श्री. राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रा. प्रिती काळे, प्रा. विपुल त्रिवेदी, प्रा. आशिष जाधव, प्रा. स्नेहल जमदाडे, सौ. ज्योती झोरे तसेच मुकबधिर विद्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवून दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group