कै. कमल बबनराव साळुंके यांचे प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित आरोग्य शिबिरामध्ये 167 रुग्णांवर उपचार
कंदर प्रतिनिधी
कै कमल बबनराव साळुंके यांचे प्रथम पुण्यस्मरणार्थ सद्गुरु आरोग्यधाम सातोली येथे एक्यूप्रेशर, नाडी परीक्षण, नाभी चिकित्सा, संवाहन मसाज, बोन सेटिंग, कायरोथेरपी, अशा विविध नैसर्गिक उपचार पद्धती द्वारे १६७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. परिसरामध्ये प्रथमच अशा नैसर्गिक उपचार शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिरामध्ये डॉ राम वराडे संवहन मसाजीस्ट मुंबई, कृष्णकुंज निसर्गोपचार शिरवळ चे डॉ. रामदास भिलारे, खंडाळा येथील गोविस्वेश्वरी केंद्राचे डॉ. संतोष कदम, रावणगाव येथील राधेश्याम गोशाळेचे डॉ. विजय आटोळे, बारामतीचे डॉ. सुनील भापकर, डॉ. अनिल भावे पंढरपूर, डॉ. लिमये सोलापूर, सर्वांग योग निसर्गोपचार जालनाचे डॉ. अरुण जाधव, डॉ. ज्ञानेश्वर आर्य ,नाभि चिकित्सक वैद्य हरिश्चंद्र साळुंके आदी तज्ञांनी उपचार केले यामध्ये सर्व रुग्णांना हाडाच्या विकारांमध्ये चांगला परिणाम मिळाला.
यावेळी शिबिराचे संयोजक सद्गुरु आरोग्यधामचे संचालक वैद्य हरिश्चंद्र साळुंके यांनी सांगितले की, आरोग्यधाम येथे सर्व प्रकारच्या आजारावर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले जातात. परिसरातील नागरिकांनी याची माहिती घेऊन उपचार घ्यावेत आणि नैसर्गिक जीवनाचा आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
