Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाकृषीसकारात्मक

करमाळा तालुक्यात ऑनलाईन पिक पाहणीचे सर्व्हर डाऊन शेतकऱ्यांना बसतोय फटका

 

केत्तूर ( अभय माने) – गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पीक पाणी नोंदण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. ऑनलाइन पीक पाणी नोंदणी करून, उताऱ्यावरील पीक पाणी नोंदीच्या आधारे वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना याचा उपयोग होतो. मात्र गेल्या दहा दिवसांहून अधिक काळापासून तालुक्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.केत्तूर येथील उपसरपंच प्रशांत नवले म्हणाले, आम्ही गेल्या चार-पाच दिवसांपासून ऑनलाईन पीक पाणी नोंदण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने आमचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. परिणामी पीक कर्ज घेण्यास अडचण आली आहे. अशी परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची असून यावर करमाळा तालुक्यात ऑनलाईन पिक पाहणीचे पिक पाहणीचे सर्व्हर डाऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दरम्यान येथील गाव कामगार तलाठी माने यांना विचारले असता, सर्व्हर डाऊनच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली असून, येत्या दोन-तीन दिवसात परिस्थिती सुधारेल असे त्यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group