Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

करमाळा शहर तालुक्यात बनावट दारु विक्री बंद न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार -नानासाहेब मोरे जिल्हा उपाध्यक्ष मनसे यांचे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदन 

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर तालुक्यात बनावट दारु मोठ्या प्रमाणात विकली जात असुन यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याने याची विक्री बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली आहे.
करमाळा शहर व ग्रामीणमध्ये बनावट दारु विक्री होत असल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी राज्य उत्पादन‌ शुल्कचे अधिक्षक व स़ोलापुर जिल्हा अधिक्षक यांना याबाबत निवेदन दिले आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की
करमाळा शहर व ग्रामीण भागात कोर्टी, साडे, कंदर, केम, जेऊर, जातेगाव, पार्यवाडी, केतुर, आवाटी अशा मोठ्या गावांमध्ये व शहरातील हॉटेलमध्ये बनावट दारुची विक्री होत आहे.. या बनावट दारुमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. याकडे उत्पादन विभागाचे अधिकारी कारवाई करण्याबाबत दूर्लक्ष करत आहेत. ताबडतोब याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अन्यथा करमाळा शहर व तालुक्यात मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल बनावट दारु स्वस्तात घेऊन भरमसाट नफा कमवला जात आहे. यातून तरुणही व्यसनाधीन होत आहेत व सरकारचा महसूलही बुडत आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा महाराष्ट्र नव निर्माण सेना तीव्र आंदोलन करेल. तपासणी करुन त्वरीत कारवाई करण्यात यावी, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते स्वतः मनसे स्टाईलने कारवाई करतील, कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण जबाबदार असणार असा ईशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी दिला आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group