Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाराजकीय

पांडे जिल्हा परिषद गटातून युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील पंचायत समितीला लक्ष्मी सरवदे यांनी उमेदवारी द्यावी – किरण पाटील

 

घारगाव  प्रतिनिधी  पांडे जिल्हा परिषद गटामधून करमाळा तालुक्याचे युवा नेते पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील यांना व पांडे पंचायत समिती गणातून संजय सरवदे यांच्या पत्नी सौ लक्ष्मी सरवदे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील यांनी केली आहे पांडे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुषांसाठी खुला असल्यामुळे या जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे माजी आमदार नारायण आबा पाटील गटाची ताकद अनेक ग्रामपंचायती वर वर्चस्व असल्यामुळे पाटील गट पांडे जिल्हा परिषद गटामध्ये अनेक मान्यवर पाटील गटासोबत आहेत त्यामुळे पृथ्वीराज भैय्या पाटील महाराष्ट्र मध्ये विक्रमी मतांनी विजयी होतील सर्वात कमी वयाचा जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्र मध्ये विक्रम होईल पांडे जिल्हा परिषद गटातील युवक वर्गामध्ये चैतन्य निर्माण होईल पृथ्वीराज भैय्या पाटील हे युवक वर्गाचे आकर्षण असून करमाळा व माढा मतदारसंघातील जनतेसाठी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देत आहेत गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन त्यांचा आधारवड आहेत
पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्यामुळे पांडे जिल्हा परिषद गटामध्ये भरपूर विकास होणार आहे त्यामुळे पृथ्वीराज भैया पाटील यांना पांडे जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी देण्यात यावी पांडे पंचायत समिती गण मधून सौ लक्ष्मी सरवदे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group