Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

राजुरी : ग्रामस्थांच्या मागणीनुसार राजुरीत दर सोमवारी आठवडी बाजार भरणार..

 

राजुरी  प्रतिनिधी  राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने चार दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत आठवडी बाजार सुरु करण्यासाठी महत्त्वाचा ठराव सर्वानुमते सहमत  करण्यात आला. त्यामुळे *सोमवार दिनांक: 25/10/2021 दुपारी 3:00  वाजता* आठवडी  बाजार सुरू करण्यात येईल, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी  राजुरी व  पंचक्रोशीतील लोकांनी आवश्य उपस्थित रहावे. अशी विनंती सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केली . ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते, विशेषतः आठवडे बाजारामुळे दर आठवड्याला हजारो,लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते. तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावात काही प्रमाणात रोजच भाजीपाला मंडई भरते.
.                      आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे छोटे – छोटे व्यावसायिक आपली दुकाने घेऊन येतात भाजीपाला, फळे, कापड,धान्य, चप्पल, कटलरीसाहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी विक्री होऊन सर्वांची सोय होते. छोट्या व्यवसायीकानाही दोन पैसे पदरात पडतात परंतु,गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ग्रामीण भागातील भरणारे आठवडा बाजार बंद होते . सध्या कोरोनाची रुग्णसंख्या प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घटत आहे. तरीसुद्धा शासकीय नियमानुसार ग्राहक व विक्रेते यांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून बाजार येताना योग्य ती काळजी घ्यावी.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group