ग्रामसुधार समितीच्यावतीने महाराष्ट्र राज्य पुणे सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे गणेश करे पाटील यांचा 26 नोव्हेंबरला सत्कार समारंभ
करमाळा प्रतिनिधी ग्रामसुधार समिती करमाळा यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य पुणे सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सोलापूर बँकेच्या प्रशासकपदी निवड झाल्याबद्दल तसेच इंडोनेशिया येथे बायोटेक्नॉलॉजी जैवतंत्रज्ञान कॉन्फरन्ससाठी निवड होऊन यशस्वी दौरा केल्याबद्दल यशस्वी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांच्या सत्काराचे आयोजन उद्या (ता.26) सकाळी 11 वाजता यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या सेवाभवन करमाळा येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसुधार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रासुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे हे असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे, तरी या कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसुधार समितीचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे सचिव डी.जी.पाखरे तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्था यांनी केले आहे.
